विशेष प्रतिनिधी
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला चढवत मोठी कारवाई केली. मात्र या कारवाईनंतरही समाधान वाटत नसल्याचे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडले आहे. (How did the attackers get in They are still roaming freely so what is the solution Amit Thackeray’s direct question)
“माझा भारतीय सैन्यावर नितांत अभिमान आहे. त्यांनी ज्या धाडसाने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याला सलाम. मात्र, या कारवाईनंतरही पहलगाममध्ये २५ निरपराधांचें प्राण गेले. त्या हल्लेखोरांचा आजतागायत शोध लागलेला नाही, ते अजूनही मोकळे फिरत आहेत. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ते दहा बारा लोकं जे आले होते ते मरतील . ज्या अतिरेक्यांनी हल्ला केलाय त्यांना ठेचून मारा., असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अमित ठाकरे पुढे म्हणाले, “भारताने कारवाई केली, ती चांगली गोष्ट आहे. पण ‘ऑपरेशन सिंदूर’वर समाधान व्यक्त करण्याआधी आपल्याला एक गोष्ट विचारायला हवी की हे दहशतवादी भारतात घुसलेच कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? आपल्या भारतात घुसून मारलंय. त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. हे तर यंत्रणेचं अपयश आहे. जे खरे हल्लेखोर होते, जे दहा-बारा जण देशात घुसले, त्यांनी आमच्या नागरिकांचा जीव घेतला, त्यांचा अजून शोध लागत नाही. ते जर अजूनही जिवंत असतील तर खरा बदला आणि न्याय झाला, असं मी मानत नाही,” असा दावा त्यांनी केला.
अमित ठाकरे राज ठाकरे यांची भूमिका मांडताना म्हणाले, जसं राज साहेब बोलले की युद्ध हे उत्तर नाही. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याला जे सांगितलं जात ते ते करत असतात. काही लष्करचे अड्डे किंवा काही दहशतवादी अड्डे तिकडे उध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हा पहलगाम हल्ला कशामुळे झाला? अजून मोकळे फिरणारे ते आत आले कसे?
