विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने सलग दोन दिवस पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले करून धडक प्रत्युत्तर दिल्यानंतर, आता पाकिस्तानने नरमाईची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताने आक्रमक कारवाई थांबवल्यास पाकिस्तानही पाऊल मागे घेईल, असे जाहीर केले आहे. (Pakistan’s soft language after Indian attacks: If India stops, we will stop too)
जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इशाक डार म्हणाले,भारताने हल्ले थांबवायला हवेत. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. विनाकारण विध्वंस, आर्थिक नुकसान हे कुणाच्याच हिताचे नाही. जर भारत थांबला, तर पाकिस्तानही थांबेल. भारत थांबला तर आम्हीही थांबूपाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले, भारताने एनसीए अर्थात नॅशनल कमांड अथॉरिटीची थांबवायला हवे. जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाच्या बाजूने नाहीये. आम्हाला विनाकारण विध्वंस आणि पैशांची नासाडी नकोय. पाकिस्तानने फक्त स्वःसंरक्षणासाठी ही पावले उचलली आहेत. अशावेळी भारत थांबला तर परिस्थिती पुन्हा सुधारू शकते. कारण पाकिस्तानकडूनही हल्ला केला जाणार नाही.
पाकिस्तानच्या लष्कराने उधमपूर, पठाणकोट, सांबा, जम्मू आणि नागरोटा येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने ९ आणि १० मेच्या दरम्यान पाकच्या हवाई दलाच्या तळांवर आणि शस्त्रसाठ्यावर अचूक हल्ले चढवले. यामुळे पाकमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एनसीए अर्थात नॅशनल कमांड अथॉरिटीची (NCA – National Command Authority) बैठक बोलावल्याचे वृत्त आले होते. मात्र, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे वृत्त फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या एनसीएची कोणतीही बैठक बोलावण्यात आलेली नाही. पाकिस्तानची अण्वस्त्र धोरणे आणि संरक्षण योजना ठरवणारी ही संस्था आहे. पण सध्या सरकार अशा कोणत्याही टोकाच्या कृतीचा विचार करत नाही.”
भारताच्या परराष्ट्र सचिव विक्रमार मिश्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,भारत केवळ दहशतवादी तळांवरच हल्ला करत आहे. कोणतेही नागरी ठिकाण किंवा लष्करी अड्डे आम्ही लक्ष्य केलेले नाहीत. पाकिस्तानने जर पुन्हा अशा प्रकारे कुरघोडी केली, तर भारत पुन्हा प्रत्युत्तर देईल.”
अमेरिका आणि G7 राष्ट्रांनी भारताच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा दिला असून, दोन्ही देशांनी तणाव निवळावा यासाठी संवाद सुरु ठेवावा, असे आवाहन केले आहे.
