संवेदनशील मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर, शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास ठरविला सार्थ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकऱ्यांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पावसात उत्पन्न वाहून गेलेल्या शेतकऱ्याला सरकारने तातडीने मदत करून त्याच्या दुःखावर फुंकर घातली. विशेष म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी सार्थ ठरविला. ( Sensitive Chief Ministers outburst on farmers suffering Shivraj Singh Chouhans trust proved justified)

राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. अशातच वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील बोरव्हा धरण येथील शेतकरी गौरव इंदर पवार त्यांचा भुईमूग घेऊन मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आले होते. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. शेतीमाल साठविण्यासाठी असलेले शेड अपुरे होते. पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहू लागले. त्याच्याबरोबर हा भुईमूग वाहून जाऊ लागला. अनेक दिवसाची मेहनत आणि चालल्या उत्पन्नाचे स्वप्नच जणू वाहून जाऊ लागल्याने गौरव पवार अगतिकतेने भुईमुगाच्या शेंगा वाहून जाण्यापासून धडपड करू लागले. अक्षरशः त्या पाण्यात स्वतःला लोटून देऊन शेंगा गोळा करत होता. कोणीतरी त्याचा व्हिडिओ काढला. हा हृदयद्रावक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत पोहोचला.

हा व्हिडिओ पाहून स्वतः शेतकरी असलेल्या चौहान यांनी गौरव वार यांचा संपर्क शोधून त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्याला धीर दिला आणि तातडीने नुकसानभरपाईची हमी दिली. त्यांनी सांगितले, “मी शेतकरी आहे, ही वेदना मला समजते. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास सार्थ ठरविला. सरकारी पातळीवर चक्रे फिरली. पवार यांच्या मालाच्या झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्यात आला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नुकसानभरपाईची रक्कम अदाही करण्यात आली. शासनाची तत्परता, संवेदनशीलता आणि कृतीशील नेतृत्व हेच या घटनेतून अधोरेखित झाले.

 

#गौरवपंवार #शेतकरीआधार #शिवराजसिंहचौहान #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्रशासन #मूगफलीफसल #शेतकरीहित #FarmersFirst #KisanSupport