मुंबई :लष्कराच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देणे सोडून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत. किती नुकसान झाले हे विचारत आहेत. देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. हे करून का तुम्हाला पाकिस्तान-ए-इशारे मिळणार आहे का? पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो तर देशात झीरो झाले आहात. हे देशप्रेम नाही तर देशद्रोह आहे. बाळासाहेब असते तर अशा सगळ्यांचा कोर्ट मार्शलच केला असता, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला. ( Hero in Pakistan and Zero in India, Eknath Shinde’s attack while showing news from Pakistani media)
आपल्याकडे आत्मविश्वास आहे तर त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविशावास आपल्याला विकासाकडे नेतोय आणि त्यांचा अहंकार त्यांना विनाशाकडे घेऊन जात असल्याचे आपणास दिसतेय. काँग्रेस दावणीला शिवसेना बांधण्याचे पाप कुणी केले, हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कंबरेचे लोक्याला गुंडाळले. शिवसेनेच्या मतदारांशी, बाळासाहेबांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी विश्वासघात केला.
सरडा रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील महाराष्ट्राने पाहिलाय, हे मी नाही तर त्यांचेच सगेसोयरे आणि भाऊबंद सांगत आहेत. बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाहीत. विचारांसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली. तर दुसरीकडे, बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे त्यांच्या विचारांना धुळीस मिळवले. बाळासाहेब असते तर त्यांना मिरचीची धूर दिली असती, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.
