मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी फरार मारणे टोळीचा सूत्रधार रुपेश मारणे नऊ महिन्यांनी अटकेत

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : कोथरूड परिसरामध्ये फेब्रुवारीमध्ये शिवजयंती दिवशी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करुन फरार झालेल्या गजा मारणे टोळीचा सदस्य रुपेश मारणे याला कोथरुड पोलिसांनी मुळशीतील आंदगावमधून अटक केली आहे. गजा मारणे तुरुंगात असल्याने रुपेश टोळीची सर्व सुत्रे चालवायचा.
( Rupesh Marne Key Aide of Gangster Gaja Marne Arrested Nine Months After Assault on BJP Worker)

कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जोग हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करुन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र यानंतर रुपेश मारणे हा फरार झाला अनेक महिने तो लपून बसला होता, अखेर सोमवारी रात्री मुळशीतील आंदगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वाद झाला. या वादात रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संगणक अभियंता देवेंद्र जोग याला मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र रुपेश मारणे फरार झाला. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते.
मारहाणीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण पोलिस आयुक्तांना दिल्या असल्याचे सांगितले होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, ‘ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्र सारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *