नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ,दाेन डिसेंबरला 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातअनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
( Municipal Polls AnnouncedElections for 246 Municipal Councils and 42 Nagar Panchayats to Be Held on December 2)

या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात10 नोव्हेंबर 2025 पासून सुरूवात हाेणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
17 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवारी अर्जांची पडताळणी 18 नोव्हेंबर 2025 राेजी असेल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर 2025 आहे. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर 26 नोव्हेंबर 2025 राेजी जाहीर हाेती. मतमोजणी 3 डिसेंबर 2025 राेजी हाेणार आहे.
यंदा नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सुविधेसाठी एका खास अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याचीही माहिती दिली. दिव्यांग मतदार, तान्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल. अनेक ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी व कर्मचारी या महिला असतील.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील. या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवर त्यांना मतदान करता येईल. अशा प्रकारे दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रांवर मतदान करता येईल.
संबंधित मतदाराने काहीही संपर्क् केला नाही, तर सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल. त्यानंतर हा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केले नाही असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *