नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजना आणि प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्याची मागणी केली.
https://x.com/Dev_Fadnavis/status/2089247831051911459
पंतप्रधान मोदी यांची भेट नेहमीच नवी ऊर्जा देणारी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यांवर मिळणारे मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला मिळणाऱ्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

