या महाराष्ट्राला झाले काय ?



हा एक प्रश्न आहे, जो आज सर्व सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. काय झाले आहे महाराष्ट्राला? या महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटले तर त्या व्यक्तीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र याच महाराष्ट्रात जेव्हा ओवैसी सारखे एक नेते औरंगजेबाच्या मजारीवर जातात. तो औरंगजेब ज्याविरोधात मराठी वीरांनी आपले बलिदान दिले, ज्याविरोधात शिवाजी महाराज लढले, त्याच्या मजारीवर जाऊन फुलं वाहून येतात त्यावर महाआघाडी सरकार एक चकार शब्द सुद्धा काढत नाही? या महाराष्ट्रात दाऊद सारख्या आतंकवाद्यासोबत व्यवहार करणारे नवाब मलिक आरोपी असून सुद्धा मंत्रीपद सोडत नाही, मात्र एका अभिनेत्रीला शरद पवारांच्या विरोधात एका फेसबुकच्या पोस्टमुळे अटक करण्यात येते? याला काय अर्थ आहे ?

हे प्रश्न काही आमच्या मनातील नाही, का कुणी छापायला सांगितलेले नाही, मात्र हे प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आहेत. महाआघाडी सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या गोष्टी घडून गेल्या. ज्यामधील काही ठळक पुढील प्रमाणे :

1. कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार.
2. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा रहस्यमयी मृत्यु. (त्या पुढे थांबलेला तपास)
3. मॅनेजर दिशा सालियान हिचा मृत्यु.
4. पालघर येथे साधूंचे मॉब लिंचींग
5. मनसुख हिरेण प्रकरण
6. सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरण
7. अनिल देशमुखांचा राजीनामा, त्यांच्यावर कारवाई
8. नवाब मलिक यांचे प्रकरण
9. पत्रकार अर्णब गोस्वामी सोबत केलेली क्रूर वर्तवणूक

10. अभिनेत्री कंगना रणौतच्या कर्यालयावर केलेली कारवाई
11. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर केलेली कारवाई
12. अभिनेत्री केतकी चितळेला अटक
13. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्या वाहनावर हल्ला


एकूण किती वर्षे झाली या सरकारला सत्तेवर येऊन ? 3 वर्षे. 3 वर्षात 13 प्रकरणे ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात नाही हे स्पष्ट होत आहे, किंबहुना महाराष्ट्र सरकारमधीलच लोक यातील काही प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. हे किती भयंकर नाही का?



अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचे ? कायदा सुव्यवस्था जरका राज्यात नसणार तर सामान्य माणसासोबत घडणाऱ्या समस्या आणि गुन्हा कोण सोडवणार ? पोलिसांवर सामान्य जनतेचा ढासळत चाललेला विश्वास, सरकारवरुन उडत चाललेला भरोसा, यामुळे राज्यात एका प्रकारच्या भितीचे वातावरण आहे. याचे काय करायचे ?

एकूणच हे सर्व पाहता, माझ्या या महाराष्ट्राला काय झाले आहे ? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला पडला आहे. आता पुढे काय होणार हे तर भगवंतालाच ठाउक. सामान्य माणूस मात्र आता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट बघतोय हे मात्र नक्की.