आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवाशन सुरू आहे. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर फैलैवर घेतल्याचे पाहायाला मिळाले आहे. त्यावर आज विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना आषाढी वारीला जाण्याऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये झालेल्या वारकऱ्यांवरील पलिसांच्या लाठीचार्जवर उत्तर दिले त्यावेळी ते बोलत होते.

आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिरप्रवेशावरून वाद उपस्थित झाला होता. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या प्रकरणावर उत्तर दिलं आहे.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. मागच्या वर्षी मंदिरात प्रवेश दिला त्यावेळी महिलांच्या अंगावर महिला पडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजनावर बैठक झाली. यामध्ये वरिष्ठ पोलीस आधिकारी, आळंदी शहरातील काही प्रतिष्ठीत मंडळी, 56 दिड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्यामध्ये बैठक झाली.

‘या बैठकीमध्ये 56 दिंड्याना प्रत्येकी 75 पास द्यायचे. पहिलं त्यांना प्रवेश द्यायचा. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेर निघाल्यानंतर इतरांना दर्शनासाठी आत सोडायचं हे ठरलं होतं. त्याचवेळी दर्शन सुरू असताना सुरक्षेसाठी तिथे काही बॅरिकेट लावले होते.”बॅरिकेट लावलेल्या ठिकाणी जोग महाराज शिक्षण प्रशालेचे काही आजी माजी विद्यार्थी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. त्यांना समजवण्यात आलं, आत गेलेल्यांच दर्शन होऊ द्या. मग तुम्ही जा असं सांगण्यात आलं.

राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी वारंवार सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्याचा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, विरोधकांच्या या दाव्यातील हवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे. राज्य सरकारने निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत, असं जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका 1888 कलम 18 (1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.