आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती : उजयनराजे भोसले


प्रत्येकाला सत्ता हवी असते, मात्र आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करण्याची वेळच आली नसती. असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी राज्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आज उदयनराजे यांनी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली, त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच “आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरूपी एकत्र राहणार असे दिसत आहे” असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर आज पुणे दौरा करून सातारमध्ये जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होतील. त्यामुळे मी आज सातारमध्ये नसल्याने आज त्यांची पुण्यात भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी यावेळी नमूद केले.  

मग माझी शिवसेना म्हणू का?

जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असेही ते यावेळी म्हणाले.