
“आज देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. ज्या प्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कि, आपल्या देशाला आता अमृतकाळ सुरु आहे आणि या अमृतकाळात आपल्या देशाला एक बलशाली आणि समृद्ध राष्ट्र आपल्याला बनवायचे आहे. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रात देखील आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन महाराष्ट्राला एक विकसित राज्य बनवू.” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
“जे अनाम आणि गुमनाम स्वतंत्रता सेनानी आहेत, त्यांना आजच्या या खास दिवशी मी नमन करतो,” असे देखील ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी जी यांनी ज्या प्रकारे सांगितले कि आता आपला अमृत काळ सुरु आहे, आणि “आपल्याला आता पुढच्या 25 वर्षांचा विचार करून सर्व समावेशक विचार करायचा आहे. गोगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, बारा बलूतेदार, ओबीसी, अल्पसंख्यांक, दीन – दलित, आणि सर्वच स्तरातील लोकांच्या हिताचा कल्याणाचा आणि विचार हे सरकार करेल आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणाऱ्या योजना हे सरकार लागू करेल.” असेही ते यावेळी म्हणाले.
आज भारताच्या 76 स्वातंत्र्य दिनानिमित्त फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
