महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. आम्ही त्याच कालावधीमध्ये साडेतेरा लाख कोटी एमएसपी वर खर्च केले. त्यावेळच्या.कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली आहे.
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भाषणात मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम आम्ही केले असल्याचे देखील मोदी म्हणालेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयुष्यमान भारतमधून देशभरात ७० हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यात महाराष्ट्रात १ कोटी १० लाख कार्डचे वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तर “सबका साथ, सबका विकास” ही भाजपची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. २०१४ अगोदर फक्त घोटाळ्याच्या चर्चा होत होत्या.. आता सगळीकडे विकासाचे आकडे पाहायला मिळत आहेत. तसेच केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा ही नवी योजना देखील आणली असल्याचे ते म्हणालेत.
