पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात सिंचनासाठी 30 हजार कोटी दिले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2015 साली विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं. आज त्या कामाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्तेच होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. जगभरातून साईभक्त शिर्डीत येत असतात. त्यांच्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले. शिर्डीत आयोजित केलेल्या सभेला ते संबोधित करत होते.

विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज शिर्डीमध्ये आले आहेत. यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले असून हजारोंच्या संख्येने मोदींना ऐकण्यासाठी लोक जमले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये दिले आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आम्ही सिचंनाची कामे पूर्ण करु शकलो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. निळवंडेसारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले.

साई भूमितील विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे. जगभरातून साईभक्त सातत्यानं या ठिकाणी येतात. याठिकाणी विविध उपक्रम येत आहेत. ‘नदी जोड प्रकल्पाद्वारे आपण हे पाणी वळवू शकतो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला या पाण्याचा फायदा होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.