मराठा समाजाने राजकीय पुढार्‍यांना घातलेली गाव बंदी अयोग्य – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील सर्वच पक्ष हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यामुळे मराठा समाजाने राजकीय पुढार्‍यांना घातलेली गाव बंदी ही अयोग्य आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघर दौऱ्यावर असताना माध्यांनशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्वच पक्षांची भूमिका ही मराठा आरक्षण मिळावं हीच आहे. मात्र हे आरक्षण देताना कोणावरही अन्याय होणार नाही अशी सर्व राजकीय पक्षांची स्पष्ट भुमिका असून राज्यातील मराठा समाज हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जात असताना अशाप्रकारे गावात राजकीय पक्षांना बंदी घालणं हे अयोग्य असल्याचं मत देखील बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.यावेळी

भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यापासून पालघर जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असल्याने अंतर्गत नाराजी ही सर्वच पक्षांमध्ये असून मी स्वतः यासंदर्भात नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.