मुंबईतील म्हाडा वसाहतींसाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुंबईतील 56 म्हाडा वसाहतींचे सेवा शुल्क माफ केल्याची घोषणा आज नागपुरात केली. ही रक्कम 384 कोटींची आहे.मुंबईतील म्हाडा वसाहतींचे सेवा शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील सर्व आमदारांनी केली होती. त्यावर राज्य सरकारने सरकारात्मक निर्णय घेत सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली.
याापू्र्वी सेवा शुल्क वाढून 50 टक्के झाले होते. याचा सामान्य नागरिकाला मोठा बोजा सहन करावा लागत होता. त्यामुळे आम्ही बैठकीत सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला घेतला असं ते म्हणाले. प्रविण दरेकर आणि आणि आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबतची मागणी केली होती, त्यामुळे आम्ही निर्णय घेतल्याचंही सावे म्हणाले.मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. यात लाखो मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्य करत आहेत. सरकारच्या सेवा शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे या लाखो मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
