मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटते, जयंत पाटलांशी शीतयुद्धात रोहित पवार यांनी बोलून दाखविली नाराजी

विशेष प्रतिनिधी

मुंबई :मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतेय असे म्हणत रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   राष्टवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे दोघेही नाराज आहेत. आमदार रोहित पवार यांनी आपली नाराजी थेट बोलवून दाखविली आहे. (Some leaders feel that I am falling short, Rohit Pawar expressed displeasure with Jayant Patal during the Cold War.)

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘पक्षाची जी बैठक झाली त्यात मी आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे त्यात काय चर्चा झाली ते मी सांगू शकणार नाही. पण अजूनपर्यंत माझ्याकडे कोणतीही जबाबदारी आलेली नाही. पण जबाबदारी दिली नाही म्हणून मी  नाराज आहे, असा अर्थ नाही. सात वर्ष मी पक्षासाठी लढत आहे, मात्र त्यात मी कमी पडत आहे, असं काही नेत्यांना वाटत असावं. पण फक्त आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला किंवा नसला तरी मी लोकांच्या हितासाठी लढत आलेलो आहे. शरद पवार यांचा मला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम पाठिंबा राहिलेला आहे. तोच एक पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याचेदेखील बोललं जातं आहे. छावा चित्रपटाच्या संबंधित एक पोस्ट रोहित पवारांनी शेअर केली. यानंतर आमदार रोहित पवार हे राष्टवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात नाराज असल्याचे सांगितले जातंय. शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, असे रोहित पवार यांनी लिहिले आहे. त्यांच्या पोस्टमुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *