नवी दिल्ली : भारत के मस्तिष्क पर वार किया तो हमने उनकी छाती पर वार किया” असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. भारताने पाकिस्तानवर केलेली ही कारवाई केवळ सीमा पार दहशतवादी तळांवर हल्ला नाही, तर त्यांच्या भूमीचे कवच फाडून त्यांच्या मुळावर घाव घालणारी कारवाई होती, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.
( If you hit India on the head we will hit you on the chestsays Defence Minister Rajnath Singh)
ऑपरेशन सिंदूर ही भारताने आतापर्यंतची केलेली सर्वात मोठी लष्करी कारवाई केल्याचं जाहीर करत, देशाची सुरक्षा रेषा ओलांडणाऱ्या प्रत्येकाला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल असे ठामपणे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, “भारत आता फक्त बचाव करत नाही, तर गरज पडल्यास कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यासही तयार आहे. हा लष्करी पराक्रम तर. आहेच पण त्याचबरोबर स्पष्ट राजकीय भूमिका देखील आहे. भारत शांततेचा पुरस्कर्ता असला तरी सहनशीलतेला मर्यादा आहेत.
जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले, मी केवळ संरक्षण मंत्री नाही तर देशाचा एक नागरिक आणि सैनिकांपर्यंत जनतेचा संदेश पोहोचवणारा डाकिया आहे. जवानांच्या शौर्याला सलाम करतो. त्यांची हिंमत आणि तडफदार लढा गौरवशाली आहे.
जम्मू-कश्मीरमधील स्थानिक लोकांनी दहशतवादाच्या विरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेचंही त्यांनी स्वागत केले. ते म्हणाले, आज काश्मीरमध्ये जनतेत दहशतवादाविरोधात रोष आहे. ही बदलती मानसिकता देशासाठी महत्त्वपूर्ण आहे.
पाकिस्तानच्या संदर्भात ते म्हणाले, “२० वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर पाकिस्तानने दहशतवाद थांबवण्याची हमी दिली होती, पण त्यांनी विश्वासघात केला.” आता चर्चा होणार असेल, तर ती दहशतवादावर नव्हे, तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले, कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्धासारखा मानला जाईल.” या भूमिकेने भारताची सुरक्षा नीती किती आक्रमक आणि स्पष्ट झाली आहे, हे सिद्ध होतं.
पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “पाकिस्तान जिथे उभा राहतो, तिथेच कर्ज मागणाऱ्यांची रांग लागते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून (आयएमएफ) पुन्हा पुन्हा कर्ज मागत आहे. यावरून पाकिस्तानची परिस्थिती काय झाली आहे याची कल्पना येईल.
रामचरितमानसचा दाखला देत, राजनाथ सिंह म्हणाले, “जहां सुमति तहं संपति नाना, जहां कुमति तहं विपत निधाना” म्हणजे चांगल्या विचारांमुळे समृद्धी येते आणि वाईट विचारांनी देश संकटात सापडतो.
