पुणे रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींजींच्या पुतळ्याचे डोके कोयत्याने उडविण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींजींच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केला. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे मुंडके उडवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. हातात कोयता घेऊन तो पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करीत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिस त्याची चौकशी करीत आहे.
( Attempt to decapitate Mahatma Gandhis statue with a sickle at Pune railway station)

सुरज शुक्ला या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री सुरज शुक्ला याने पुणे रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यानंतर तेथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ जाऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हातात धारधार शस्त्र होते. पुतळ्याची विटंबना करण्यापूर्वी त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले.

सुरज शुक्ला हा मुळचा वाराणसी येथील आहे. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात आला आहे. तो वाईवरुन पुण्यात आला होता. विविध ठिकाणी धार्मिक पुस्तके, रुद्राक्ष विकण्याचे काम तो करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.