छत्रपती संभाजी महाराज नगरचे माजी खासदार व ठाकरे गटाचे महत्वाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या पुत्राला सरकारी कामात हस्तक्षेप करायची सवय महाविकास आघाडीचे सरकार असताना लागली असावी त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्याची सुपाऱ्या घेत असावेत. पण त्यांच्या हातून बदलीचे काम मात्र पूर्ण झाले नाही. दोन वर्ष झाले तरी बदली झाली नाही व पैसे हि वापस भेटले नसल्याचे एक संभाषण समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सुरुवातीला या संभाषणाची पुष्टी कोणी केली नाही पण एबीपी माझा चे प्रतिनिधी ऋषिकेश खैरे यांच्या सोबत संवाद साधत असताना ऋषिकेश खैरे यांनी आपण पैसे घेतले असल्याची कबुली दिली व आपण संभंधित व्यक्तीला त्याचे पैसे परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आत याला निर्लजपणा म्हणायचं की नालायकपणा?
या सगळ्या प्रकरणात हा प्रश्न निर्माण होतो कि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत नेते जे आपण ठाकरे गटाचे फार महत्वाचे नेते असल्याच्या अविर्भावात मिरवत असतात त्यांची यांच्या पक्षात काय किंमत आहे हे ह्या प्रकारावर समजून येते. या घटनेच्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री होते व वन मंत्री देखील शिवसेनेचेच होते तरीही दोन वर्ष हि बदली होऊ शकली नाही यावरून शिवसेनेत चंद्रकांत खैरे यांची पक्षातील किंमत दिसून येते. दोन लाख रुपये मिळवायचा कामधंदा सुद्धा जर माझी खासदाराच्या पुराकडून होत नसेल तर पक्षात तुमची किंमत नाही हे त्यांनी लक्षात घावे. हे अशा प्रकारे पैसे घेऊन बदली करावी का? अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने बदलीसाठी पैसे द्यावेत का? भ्रष्टाचार करावा का ? हा नंतर चा विषय आहे.
एक वनविभागाची बदली करण्यासाठी एक कर्मचारी जर २ लाख रुपये देत असेल हि बदली वर्ग -३ ची असावी कारण वर्ग -१ ची बदली करण्यासाठी किमान ७-८ लाख रुपये घेत असतील त्यामुळे हि बदली वर्ग २ किंवा ३ ची असावी एवढी साधी अडली देखील खासदारांचा मुलगा करू शकत नाही.
एक वन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एवढे पैसे आले कुठून हा प्रश्न पडतो कारण तो त्या संभाषणात म्हणाला की आता तुम्ही माझे पहिलेच पैसे परत द्या मी आता बदलीसाठी एका व्यक्तीला अजून पैसे दिले आहेत यामुळे एका सामान्य कर्मचाऱ्याकडे एवढे पैसे आले कुठून? ऋषिकेश खैरे यांच्या या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या कळत कशा प्रकारे भ्रष्टाचार हो होता हे समोर येते इतर नेत्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी देखील असे प्रकार केलं असतीलच हे नक्की या वरून हे स्पष्ट होत कि महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्ट होत.
