केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली लागू करण्याची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना व्यापारी, उद्योजक आणि नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामण यांनी 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कररचनेतही बदल करण्यात आले आहेत. आधी टॅक्सचे सहा स्लॅब होते. ते आता पाच करण्यात आले आहेत. त्यामुळेही मोठा फरक पडणार आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. तसंच शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी विविध पावलं सरकारकडून उचलली जात आहेत. यंदाच्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 1,04,273 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं घोषणा करण्यात आली आहे.

जुन्या टॅक्स प्रणालीत तुम्हाला अधिक कर भरावा लागत होता. पण काही गोष्टींची सूटही मिळत होती. 50 टक्क्याहून अधिक लोक नव्या टॅक्स प्रणालीनुसार टॅक्स भरत आहेत. या टॅक्स स्लॅबच्या बदलाचा फायदा सामान्य लोकांना होईल. 7 लाखापर्यंतचं उत्पन्न कमी व्हावं असं प्रत्येकाला वाटत होतं. आता तर 7 लाखापर्यंतंच उत्पन्न करमुक्त झालंच. शिवाय मॅक्सिमम स्लॅबमध्ये बदलही झाला आहे.

नव्या कर रचनेनुसार 7 लाख रुपयांचं उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. 8 लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर 9 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 45 हजार, 10 लाख उत्पन्नावर 60 हजार, 12 लाख उत्पन्नावर 90 हजार आणि 15 लाख उत्पन्नावर 1 लाख 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे.

काय स्वस्त होणार?
1) एलईडी टीव्ही
2) टीव्हीचे सूटे भाग
2) इलेक्ट्रिक वस्तू
3) मोबाईल फोन, पार्ट्स
4) इलेक्ट्रिक वाहने
5) खेळणी
6) कॅमेरा लेन्स

काय महागणार?
1) सोन्याचे दागिने
2) चांदीचे दागिने
3) चांदीची भांडी
4) विदेशी किचन चिमणी
5) सिगरेट