नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सुरू असलेले वाद प्रचंड विकोपाला गेल्याचे दिसत आहे पक्षामध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे दिसत आहे नाना पटोले आणि पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ऐकमेकांसमोर उभे टाकल्याचे चित्र दिसत आहे. आणि काँग्रेस मधील सुरू असलेल्या या वादाचे धक्के आता महाविकास आघाडीला बसू लागले आहेत काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडी कोसळते की काय अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नुकतीच सांगता झाली. संपूर्ण यात्रेत राहुल गांधी यांनी संघ आणि भाजप यांच्यावर टीका केली आणि त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसच्या पदरात काही पडेल याची शक्यता कमीच होती. आणि ती शक्यता खरी सुद्धा ठरली भारत जोडणे तर शक्य झालेच नाही उलट पक्षातच राज्या – राज्यामध्ये अंतर्गत वाद असल्याचे सिद्ध झाले राजस्थानमध्ये देखील काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाद आहे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि युवा नेते सचिन पायलट यांच्यातील वाद नेहमीच समोर आला आहे. आणि तीच परिस्थिती आता महाराष्ट्रात सुरू आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद समोर आला आहे काँग्रेसचे केंद्रच कमकुवत झाल्याने राज्य राज्यांमध्ये संस्थानिक प्रबळ झाले आहेत आणि हे संस्थानिक आपल्या स्वार्थासाठी पक्ष बुडवण्यास निघाले आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांचा संघर्ष एवढा विकोपाला गेलाय की राहुल गांधी यांना महाराष्ट्रातच काँग्रेस जोडो अशी यात्रा काढण्याची गरज आहे. बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संयमी नेते म्हणून ओळखले जाते ते विरोधकांवर बोलत असताना देखील कधी संयम सोडत नाहीत विरोधकांवर कधी ते पातळी सोडून बोलत नाहीत आणि कायम एका चौकटीत एका मर्यादेत ते बोलत असतात. नाना पटोले यांचे अगदी या उलट आहे नाना पटोले नेहमी उर्मट प्रकारे बोलतात आणि समोरच्याचा अपमान करणारी भाषा ते नेहमी वापरतात या दोन्ही नेत्यांची व्यक्तिमत्व प्रचंड टोकाची आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड धमसान सुरू असल्याचं पाहायला मिळते. थोरात आणि पटोले या दोघांमध्ये अंतर्गतवाद वाढला तो नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपासून या निवडणुकीमध्ये थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला व ते विजयी झाले नाना पटोले यांच्या नेतृत्वाला हा धक्का बसल्याचे दिसून आले. सत्यजीत तांबे विजयी झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केलं. थोरात यांनी नाना पटोले यांची तक्रार थेट हायकमांड कडे केली मात्र थोरात यांच्या या तक्रारीकडे आहे हायकमांडने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
नाना पटोले हे वारंवार ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य करत असतात वारंवार स्वबळाचे नारे देत असतात आणि त्यामुळे महाविकास आघाडीला हादरे बसण्याची भीती काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. नाना पटोले जे काही बोलत आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर बोलत आहेत असा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटेल यांना महाविकास आघाडी संपवण्याची सुपारी दिली आहे असा थेट आरोप काही काँग्रेस नेते करताना दिसतात. काँग्रेसचे हे प्रकरण हाय कमांड कडे गेलं आहे. पण राहुल गांधी या संपूर्ण प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप करतील अशी शक्यता कमी आहे परंतु या एकूण वादाचा परिणाम काँग्रेसवर होणार हे निश्चित आहे परंतु हा वाद काँग्रेस पुरताच मर्यादित राहणार की? नाना पटोले महाविकास आघाडीला घेऊन बुडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण नाना पटोले यांच्यावर असलेली पक्षातील नाराजी ही फक्त पक्षाला घातक नसून महाविकास आघाडीला घातक आहे हे इतर पक्षातील नेते जाणून आहेत.
