तुमच्या नेत्यांचं नेतृत्व कमी पडत होतं का? नाना पाटोलेंचा संजय राऊत यांना प्रश्न

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्यजित तांबेंच्या प्रकरणापासून काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर येत आहे. हा सर्व गदारोळ सुरु असताना शिवसेना ठाकरे गट यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले नसतं असे विधान राऊतांनी केलं केलं होत त्यावरच आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या आरोपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला असून शिवसेनेच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे.मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहेत. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे असा चिमटाकाढला पुढे बोलताना पटोले म्हणाले ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचं नेतृत्व कमी पडत होतं का? असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला.

त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं ते त्यावर ते बोलत नाही. भाजपने सरकार पाडलं आपण राज्यातील प्रश्नावर लक्ष द्यावं मी फक्त राऊतांना सल्ला देऊ शकतो मी काही विद्वान नाही. अध्यक्षपद देण्याचा निर्णय हा काँग्रेस हायकमांडचा होता राजीनाम्याचा निर्णय सुद्धा त्यांनाच विचारून घेतला. पक्षाचा आदेश मी पाळला पक्षाचा आदेश पाळणार मी कार्यकर्ता आहे त्यावर आता कुणी बोलू नये असंही पटोले म्हणाले. पक्ष कार्यालय सगळ्यांसाठी, कोणताही नेता तिथे बैठक घेऊ शकतं. रायपूरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे. यानंतर बरेच फेरबदल होतील, असं नाना पटोले म्हणाले.