वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात ; राऊतांच्या आरोपावर शेलार यांचा हल्लाबोल

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा दाखला देत गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात काही विशेष फरक आहे असे आम्ही मानत नाही. असा हल्लाबोल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिले आहे. दोन्ही गटांकडे असलेल्या लोकप्रतिनिधी संख्या त्यांना मिळालेली मते यावर आयोगाने हा निर्णय दिला आहे. मात्र संजय राऊत यांनी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगावरच भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, माझी खात्रीची माहिती आहे.

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.आशिष शेलार यांनी यावर हल्लाबोल करताना लोकमान्यच्या अग्रलेखाचा दाखला दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे लोकमान्य टिळकांनी केसरीतील “आधी कोणते राजकीय की सामाजिक” या अग्रलेखात म्हटले आहे की “विचारशक्तीस अनावर सोडून जे जे तरंग निघतील ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजाची चिलीम ओढून बडबडणाऱ्या गृहस्थात काही विशेष फरक आहे. असे आम्ही मानत नाही रोज सकाळी टिव्हीवर वेगवेगळे हावभाव करुन बोलणाऱ्या एका गृहस्थास महाराष्ट्र पाहू लागला की, लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या वरील वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राचा सकाळचा ताजा अनुभव ही असाच होता.