ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत म्हणजे सभ्यतेचे सगळे संकेत झुगारून देऊन बालिश बडबड अशी टीका होत आहे. विधिमंडळाला चोरमंडळ म्हणाल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला आपल्या व्यर्थ बडबडीने अडचणीत आणण्याचे एकमेव काम गेल्या तीन साडेतीन वर्षात राऊत यांनी केले. अभिनेत्री कंगना राणावत यांना राऊत यांनी हरामखोर असे म्हटले होते.
कोर्टाचा दट्ट्या बसल्यावर हरामखोर म्हणजे नॉटी अशी सारवासारव त्यांनी केली.राज्यातील सत्ता संघर्षावेळी तर राऊत यांचा तोल सुटला होता. बंड केलेल्या आमदारांविरुद्ध बोलताना ते म्हणाले होते आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येतील. राऊत यांचे हे विधानच ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात अडचणीचे ठरत आहे. त्याच्या पुढे जाऊन राऊत म्हणाले होते एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या.नि वडणुकीला सामोर जा. गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच एक असा दिसला. पण तुझ्या मायला आता ढुंगणाला पाय लावून पळाला. खासदार या नात्याने कायद्याचे रक्षक असलेले राऊत यांनी कायद्याचे राज्य नाकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. कायदे आमच्यासाठी बनवण्यात आले नाही. आम्ही हवे तेव्हा बदलू. भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता असे बरळण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.राऊत विरोधकांवरच टीका करतात असे नाही तर स्वकीयांवरही दुगाण्या झाडतात. महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही त्यांनी सोडले नाही.
मुंबईचा एकेकाळचा नामचीन गुंड करीम लाला याची इंदिरा गांधींना भेट घेतली होती असे ते म्हणाले. काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतल्यावर तोंडावर पडले.
उदयनराजेंना राऊत म्हणाले होते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या. उद्धव ठाकरे यांची टिंगल होण्यात राऊत यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.अधिकाऱ्यांपेक्षा कंपाउंडर हुशार असतो मी कंपाउंडरकडून औषधे घेतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर राऊत यांचा कंपाउंडर म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात येऊमहिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह बोलणे हे तर राऊत यांचे वैशिष्ट राहिले आहे. आपल्याच एका सहकाऱ्याच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना आई माई वरून शिव्या दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिप वरूनच संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर देखील दाखल झाली महाराष्ट्रन – कर्नाटक सीमाप्रश्न वादातआता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का? काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती असे अत्यंत गलिच्छ विधान राऊत यांनी केले होते.शिंदे गट ही फक्त एक टोळी झाली आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत. एकतर त्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात नाहीतर पोलीस एन्काऊंटरमध्ये असे म्हणणाऱ्या राऊत यांना आता यात शिंदे सरकारकडून अटक होण्याची शक्यता आहे.
