हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यावेळी संजय राऊत आक्रमक झाले होते. आता संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षात एका बाहेरून आलेल्या नेत्याच्या बाबतीत कारवाई करण्यास सुरवात केली. भीमा सहकारी साखर कारखान्यात मनी लॉंड्रीन झाली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी ईडीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र पाठवले. या पूर्ण प्रकरणात असे वाटायला लागते की आतापर्यंत शिवसेनेचे काम करणारे संजय राऊत कुठेतरी शरद पवारांसाठी काम करत आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.
संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचे नेमके कारण काय?
कोणतीही घटना घडत असताना त्यांचं टायमिंग पाहणे महत्वाचे असते. कोणत्या वेळेला ही घटना घडत होती. हे पाहायचं असेल तर थोडं मागे जावे लागेल. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात संजय राऊतांनी विधीमंडळाबाबत बोलताना, हे विधीमंडळ नाही तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे सभागृहात बराच गदारोळ झाला होता. यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी हक्कभंग समिती स्थापन केली आणि या हक्कभंग समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल कुल यांची नेमणूक केली होती. संजय राऊतांना ज्या हक्कभंग समितीच्या समोर उभे राहायचे आहे.
त्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांवर आरोप करून स्वतः वर होणारी चर्चा इतर ठिकाणी वळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकीकडे विधीमंडळाला चोरमंडळ म्हणायचे आणि दुसरीकडे विधिमंडळातील एका समितीच्या अध्यक्षांवर दबाब आणण्यासाठी नवीन तंत्र वापरायचं ही संजय राऊतांची नवी खेळी. अध्यक्ष म्हणून राहुल कुल यांनी संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलवले तर आरोपाचा कागद संजय राऊतांच्या हातात असेल.
संजय राऊतांच्या आरोपाचे पुढे काय होते हे पाहणे आता उत्सुकतेचे असणार आहे. तसे याआधी राऊतांनी किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. त्याच काय झाले? तर काहीच नाही. मोहित कंबोजवर आरोप केले त्या आरोपांचे काही झाले नाही. राहुल कुल यांच्यावर झालेल्या आरोपांचा ते स्वतः खुलासा देतील ते विधीमंडळाच्या समितीचे अध्यक्ष आहे.
राहुल कुल हे बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभेचे नेतृत्व करतात. त्यांची कडी टक्कर ही पवार परिवाराशी आहे. सुप्रिया सुळे आणि पवारांच्या विरोधात ते लढत असतात. त्यामुळे त्यांच्या सहकारी साखर कारखान्याला ताब्यात घेण्यासाठी कोण प्रयत्न करत हे महाराष्ट्र्राला माहिती आहे. राहुल कुल यांच्या बाबतची माहिती कोणाकडे आहे हे सर्वत्र माहिती आहे. त्यांना बारामतीतून विरोध आहे आणि बारामतीतून ही माहिती संजय राऊत यांच्याकडे जाते. संजय राऊत हीच माहिती माध्यमे, उपमुख्यमंत्र्यांना आणि ईडीच्या समोर सादर करतात. राऊतांचे शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन येणे त्यांना मोठा नेता म्हणणे हे त्यांनी आजपर्यंत केले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला लाभदायक होईल असे विषय संजय राऊत काढत असतात. या विषयात ठाकरेंचा किंवा त्यांच्या गटाचा फायदा काय तर काहीच नाही.
