साई रिसॉर्ट प्रकरण : ईडीची कारवाई आणखी एकाला अटक

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच तापले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.

चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत तसेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावल्याचं बोललं गेलं. सभा पार पडून आठवडा उलटत नाही तोच संजय कदम यांना ईडीने बेड्या ठोकल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.