
महाराष्ट्रात सध्या तौक्ते वादळाने धुमाकूळ केला आहे. काल दिवसभर सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हजेरी लावली. ज्यामध्ये किनारपट्टी जवळील काही लहान शहरे आणि गावे, तसेच पुणे मुंबई सह अन्य शहरांचा देखील समावेश होता. या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसानही झाले. त्याच पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “गेल्यावर्षी वादळ आले त्यावेळेला सरकारद्वारा जी मदतीसाठी रक्कम जाहीर करण्यात आली होती, ती अतिशय तोकडी होती, आणि ती देखील देण्यात आली नाही. असे असताना तौक्ते वादळानंतर नुकसान भरपाईचा अंदाज घेऊन सरकारने यावेळी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहायला पाहीजे.”
तौक्ते वादळामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर याचा जास्त असर होण्याची शक्यता आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार वादळीवाऱ्यांसह पाऊस पडतोय. तौक्ते वादळ गुजरातच्या दिशेने जरी सरकले असले, तरी त्याने महाराष्ट्रावर आपले चिन्ह नक्कीच सोडले आहेत. म्हणूनच विरोधीपक्ष नेत्यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे कि, आतातरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.
एकूणच महाराष्ट्राची सद्य परिस्थिती बघता सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसोबत खंबीरपणे उभे असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण जरी झाले असले, तरी देखील कोरोना पेशंट्सची सर्वाधिक संध्या आणि सर्वाधिक मृत्यु देखील महाराष्ट्रातच झाले आहे. त्यातून अनेक परिवारांवर आर्थिक संकट ओढावले आहे, असे असताना अशा परिवारांवर जर या वादळामुळे कुठले संकट आले, किंवा त्यांचे आर्थिक किंवा जीवित नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? त्यामुळे सरकारने या परिस्थितीत तरी महाराष्ट्राच्या जनतेला साथ देणे अपेक्षित आहे.
या तौक्ते वादळात दोन जहाजे देखील हरवली होती, आणि त्यासाठी शोधमोहीम सुरु होती. या शोधमोहीमेत नौदलाची हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले होते, ज्यांनी आतापर्यंत सुमारे १४६ लोकांना रेस्क्यु केले आहे. एकूणच हे वादळ भयंकर होते, आणि ते गेल्यावर च्याची चिन्हे देखील भयंकर असतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
