तौक्ते वादळामुळे भरकटलेल्या २ जहाजांना वाचवण्यासाठी नौदलाची धाव.. १४६ जणांना वाचविण्यात यश



तौक्ते वादलाने पुणे, मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात आदि राज्यांमध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झआले असून अनेकांचे जनजीवन विस्खळित झाले आहे. असे सर्व असताना या वादळात दोन जहाजे भरकटल्याचे वृत्त आले होते. या जहाजांना आणि त्यामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी नौदल पुढे आले आहे. आणि आतापर्यंत १४६ जणांना वाचविण्यात नौदलाला यश मिळाले आहे.

हवामानाचा अंदाज घेत नौदलाने या रेस्क्यू कार्यासाठी आपले हॅलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. सध्या सुरु असलेल्या एसआरला वाढविण्यासाठी नौदलाचे प्रयत्न दिवसभर सुरु असतील.

तौक्ते वादळाच्या विळख्यात सापडलेल्या मच्छिमारांसाठी नौदलाचे देवदूत धावून आलेत. काल रात्रभर सुरु असलेल्या ऑपरेशन दरम्यान 273 पैकी 146 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलं आहे. अनेकांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. चक्रीवादळात अनेक बोटी आणि जहाजं खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या होत्या. नौदलानं ऑपरेशन राबवत बोटी आणि जहाजांवर अडकलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं. त्यासाठी नौदलाची बचाव मोहीम रात्रभर सुरु होती. तोक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या पी-305 या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी आज सकाळी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत. मुंबईच्या समुद्रातील आयएनएस शिख्रा या युद्धनौकेवरून ही हेलिकॉप्टर्स रवाना झाली.

एसएआर ऑपरेशन्स संपूर्ण रात्रभर सुरु राहिलं आणि आज सकाळी 6 वाजेपर्यंत 146 लोकांना रेस्क्यू केलं गेलं. ज्यामध्ये 111 आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकातानं 17 जणांना, तर ओएसव्ही ग्रीटशिप अहिल्या आणि ओएसव्ही ओशन एनर्जीद्वारे 18 जणांना वाचवले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि खवळलेल्या समुद्रात हे कार्य करण्यात आलं. 137 जणांसह जहाजातील ‘गॅल कन्स्ट्रक्टर’ हे कुलाब पॉइंटच्या उत्तरेकडील 48 एनएम उत्तरेकडे चालले आहे. इमरजेंसी टोव्हिंग वेसल ‘वॉटर लिली’, दोन सपोर्ट वेसल आणि सीजीएस सम्राट कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

एकूणच या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात समस्या उभ्या केल्या आहे. अवघा महाराष्ट्र आधीच कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्रस्त होता. त्यातून आता या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात लढत असलेल्या लोकांचे मनोबल सुद्धा खालावले आहे. अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले, तर अनेकांचे घर वाहून गेले, अनेकांच्या घरावर झाडे पडलीत, तर अनेकांचे कसे बसे चाललेले व्यवसाय ठप्प झाले. यामुळए महाराष्ट्र आणखी काही पावले मागे गेला आहे.

आता संपूर्ण परिस्थिती कधीपर्यंत सुरळीत होते, आणि या समस्यांचा सामना आपला महाराष्ट्र कसा करतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.