कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द



भारतात अमरनाथ यात्रा किती पवित्र मानली जाते, आणि यासाठी श्रद्धा भक्ति भावाने येणारे भाविक भोले बाबाच्या दर्शनासाठी किती आतुर असतात याची आपण सगळ्यांनाच कल्पना आहे. असे असताना, कोरोनाने मात्र या यात्रेवर बंधन आणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरळ दुसऱ्यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भाविकांसाठी ही मन खिन्न करणारी बातमी असली, तरीही त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच २८ जून पासून भाविकांना ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भोले बाबांच्या दर्शनासाठी अमरनाथला जाता आले नाही म्हणून काय झाले, मात्र भाविक ऑनलाइन माध्यमातून अमरनाथचे दर्शन घेऊ शकतात. भाविकांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.



जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा  आपल्या ट्विटमध्ये  म्हणाले,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ श्राईन बोर्डासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी सर्व विधी पार पाडले जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणे जास्त गरजेचे आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करता यात्रेचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. 

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची अमित शहा यांच्यासोबत  आढावा घेण्यासाठी  बैठक घेण्यात आली होती.  या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर अधिकारी आदी उपस्थित होते.

एकूणच हिंदूंच्या देवस्थानाच्या यात्रेला जम्मू काश्मीरच्या सरकारने रद्द केल्याने वाद विवाद झाले आहेत. आणि ज्या प्रमाणे वैष्णो देवी देवस्थान येथे आणि इतर देवस्थानांमध्ये सर्व काळजी घेऊन, ठराविक भाविकांची संख्या ठेवून दर्शन सुरु आहेत, तसे अमरनाथ येथे का ठेवण्यात आले नाही असा प्रश्न देखील येथे उपस्थित झाला आहे.