भाजप विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष; काँग्रेसचे युवराज’ देशाची प्रतिमा डागाळत आहेत – जे पी नड्डा

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी (14 जून) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबद्दल अलीकडील टिप्पण्यांद्वारे परदेशी भूमीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.माजी स्व.प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे, असे नड्डा म्हणाले. भाजपच्या मेगा जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून पंजाबमधील होशियारपूर येथे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नड्डा येथे एका सभेला संबोधित करत होते.

राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यांवर जे पी नड्डा यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असताना ‘काँग्रेसचे युवराज’ राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत, असाही घणाघात जे पी नड्डा यांनी केला आहे.केवळ भाजप हाच विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. उर्वरित राजकीय पक्षांना कोणतीही विचारधारा नाही, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.

केवळ भाजप हाच विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. उर्वरित राजकीय पक्षांना कोणतीही विचारधारा नाही, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.याआधीही जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बोलतानाही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मागच्या 70 वर्षात जे काम झालं नाही ते मागच्या नऊ वर्षात झालं आहे, असं नड्डा म्हणालेत.

ज्या व्यक्तीची आजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. लोकशाहीचा आवाज दाबला होता. ती व्यक्ती आपल्या परदेश दौऱ्यामध्ये, भारतविरोधी लोकांच्या भेटीदरम्यान लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत आहे, असंही टीकास्त्र नड्डा यांनी डागलंय.