एलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर नेहमीच चर्चेत राहत आहे आहे. आता एलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा ट्विट करत केली आहे. आता ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट वाचण्यावर सध्या तात्पुरत्या मर्यादा घालण्यात आल्या आहे. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी माहिती दिली आहे.
शनिवारी जगभरातील कित्येक ट्विटर यूजर्सना ट्विट करणे, फॉलो करणे किंवा नवीन ट्विट पाहणे अशा कित्येक क्रियाकलपांमध्ये अडचणी येत होत्या. तुम्ही तुमची रेट लिमीट पार केली आहे, अशा आशयाचा संदेश यूजर्सना मिळत होता.एलॉन मस्क यांनी शनिवारी ट्विट करत ही घोषणा केली आहे. घोषणा करतान एलॉन मस्क म्हणाले, डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंट (ब्लू टिक असणारे यूजर) यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट ( ब्लू टिक नसणारे यूजर) यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी अकाऊंट उघडले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे.तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात.आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लाँच केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.ट्विटरच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचे दिसत आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू करण्यात आले आहे त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहे.
दरम्यान, इलॉन मस्कने शनिवारी आणखी एक मोठी घोषणा केली होती. यानुसार, आता ट्विटर वापरण्यासाठी यूजर्सना लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे. लॉग इन केल्याशिवाय ट्विटर ब्राऊज करणं आता शक्य होणार नाही.
