अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी आमदार,जिल्हाध्यक्षांनी मोर्चेबांधणी सुरू;जयंत पाटील नाराज ? चर्चांना उधाण

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्यालाही पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उचलबांगडी करून अजितदादांकडे हे पद दिलं जाण्याची शक्यता आहे.त्यासाठी अजित पवार समर्थकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी सकाळीच अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या समर्थक आमदारांनी हजेरी लावली असून हे आमदार अजितदादांशी चर्चा करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज अजित पवार यांचे समर्थक आमदार धनंजय मुंडे, अमोल मिटकरी,नरहरी झिरवाळ,अनिल पाटील, दौलत दरोडा, हसन मुश्रीफ, किरण लहामाटे, दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे आणि ठरावीक जिल्हाअध्यक्षांसोबत अगोदर बैठक नंतर समर्थकांनां सोबत घेऊन सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी आले आहेत. या पाचही आमदारांनी सकाळी सकाळीच अजितदादांच्या घरी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत.अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावे म्हणून हे आमदार लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदलावरही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर हे नेते शरद पवार यांचीही भेट घेणार का? मग अजित पवार नाराज आहे का? समर्थक आमदारांना जिल्हा अध्यक्षांना सोबत घेऊन लॉबिंग करतायंत का? याकडे जनतेचं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाराज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष सोडणार का? की राहणार?

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी पक्षातील आमदार आणि जिल्हाध्यक्षांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती.या भेटीत काय चर्चा झाली याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यपदाबाबतच चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांनी पक्षात नुकतीच भाकरी फिरवली. त्यात सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षा आहेत. तर अजित पवार हे विरोधी पक्षनेते. एकाच घरात तीन तीन पदं असल्याने अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद शरद पवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विद्या चव्हाणांकडून अजित पवार समर्थक आमदाराच्या भेटीवर सावरासावर

अधिवेशनासाठी काही आमदार विरोधी पक्षनेते अजित पवारांना भेटायला गेले असतील राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही अधिवेशनाअगोदर आमदारांसोबत चर्चा केली जाते त्यात अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे हे ठरत असतं त्यामुळे अजित पवारांची आमदारांनी घेतलेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये.