जे ‘मी आणि माझं कुटुंब’ एवढंच जगतात,जे नाल्यातील गाळ खातात तेच कलंक ठरवतात – आशिष शेलार

उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात आयोजित सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली होती.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आशिष शेलार म्हणाले की, उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील?त्याचबरोबर जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात, असेही ते या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

कलंक तर ते असतात

◆जे नाल्यातील गाळ खातात

◆कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात

◆गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात

◆जे रस्त्यावरचे डांबर खातात

◆जे “मी आणि माझं कुटुंब” एवढंच जगतात

थोडक्यात काय तर..

◆जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!

असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.