सीरमच्याआगीत घातपात होता का ? चौकशी केली जाणार

पुणे येथील सीरम इंस्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत घातपात होता का? याची चौकशी केली जाईल आणि तेव्हाच निष्कर्ष काढता येईल कि हा अपघात होता का घातपात? असे महाराष्ट्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट येथे अचानक आग लागल्याने हल्लकल्लोळ माजला होता. मात्र ही आग कशामुळे लागली याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

कोरोनाच्या संकटकाळात सीरम इंस्टिट्यूट येथे कोरोनाची लस तैयार करण्यात येत आहे. त्यामुळे तिथे आग लागल्यामुळे एकच चर्चेचे उधाण उठले आहे. कोरोनाची लस बनवून भारताला दिलासा देणाऱ्या या इंस्टिट्यूटच्या नवीन इमारतीतील दोन मजल्यांवर आग लागली होती. इथे आग लागल्यामुळे सुमारे १ हजार कोटी रुपयांचे नुसान झाले आहे. मात्र या आगीमुळे कोविडच्या लसीच्या आपूर्तिवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे या इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावा यांनी सांगितले आहे.



यावेळई माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सीरम इंस्टिट्यूट मध्ये लागलेली आग ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. या घटनेत केवळ एकच बाब दिलास्याची आहे कि ज्या ठिकाणी कोविड वॅक्सीन बनते आहे किंवा त्याचा साठा आहे, त्या ठिकाणाचा आणि आग लागलेल्या ठिकाणाचा आपसात संबंध नाही, त्यामुळे कोरोनाच्या लसीच्या आपूर्तिवर याचा परिणाम होणार नाही.” असे म्हणत मृतांच्या परिवारासोबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

  मात्र या आग लगण्यामागे अपघात होता कि घातपात हे आता पर्यंत स्पष्ट झालेले नाही.