मुंबई शहराची आत्मा म्हटल्या जाणाऱ्या मुंबई लोकलला कोरोना मुळे पूर्णविराम लागला होता. मात्र आता सरकारने पुन्हा एकदा मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी पासून ही लोकल सुरु करण्यात येणार आहे. मात्र यासाठी सामान्य जनतेला वेळेचं बंधन असणार आहे. ठराविक वेळेतच ही लोकल सुरु असेल. त्यामुळे लोकल वरून पुन्हा एकदा महाराष्ट्राच चर्चेचे वादळ उठले आहे. वेळेच्या बंधनांमुळे विरोधी पक्षाने मात्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्राचे प्रमुख नेते राम कदम यांनी या वेळापत्करावर आक्षेप घेतला आहे. पहिली लोकल ७ पर्यंत असेल, दुसरी लोकल दुपारी १२ वाजे पासून ते ४ वाजेपर्यंत असेल आणि तिसरी लोकल संध्याकाळी ९ ते शेवटच्या लोकल पर्यंत असेल. मात्र यामध्ये ऑफिसच्या वेळेचा विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे राम कदम यांनी ट्वीट करत या लोकलच्या वेळांवर जबरदस्त आक्षेप घेतला आहे.
ते म्हणतात, “लोकल पाच महीने उशीरा सुरुण्याचा निर्णय महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा दाखवतो. मंदिरांअगोदर बार सुरु करणारे सरकार याविषयी उत्तर कधी देणार ? सकाळी ७च्या आधी आणि रात्री ९.३० नंतर असलेल्या लोकलचा फायदा कोणाला होणार ? का या सरकारला पुन्हा एकदा बार वाल्यांचीच चिंता आहे ?” असे म्हणत कदम यांनी सरकार वर टीका केली आहे.
यामुळे सामान्य माणसाची पंचाईत होणार असल्याचं मत अनेकांनी समाज माध्यमांवर व्यक्त केलं आहे. ऑफिसच्या वेळांचा विचार न करता या लोकल्सचा काय फायदा ? असा प्रश्न येथे निर्माण होतो. लोकल सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे हे खरे, कोरोनासाठी काळजी घेणे आहे, हे देखील तितकेच खरे, मात्र त्यासाठी ऑफिसच्या वेळांचा विचार न करता निर्णय घेणे, सामान्य माणसाला कदाचित कचणार नाही, असे देखील या एका निर्णयामुळे स्पष्ट होत आहे.
