
“आज नवाभारत घडवणारा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता, या बजटचा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम कसा होईल असा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.” अशा भावना माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केल्या. अर्थसंकल्पाबद्दल आपले मत माध्यमांसोबत मांडताना ते आज बोलत होते. याशिवाय नाशिक मेट्रो आणि नागपुर मेट्रो साठी फडणवीस सरकार काळात मांडण्यात आलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि नाशिक मेट्रो साठी २०९४ कोटी रुपये आणि नागपुर मेट्रोच्या फेज-२ साठी ५९७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपुर आणि नाशिक साठी ही एक खूपमोठी खुशखबर आहे.
“भारताच्या कृषी क्षेत्राची आर्थिक तरतूद २०१३-२०१४च्या तुलनेत ५ पटीने वाढली आहे. एवढच नाही तर जे लोक हे सरकार कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद करणार असे म्हणत होते, त्यांचं तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. स्वत: वित्तमंत्र्यांनी एमएसपीचे आकडे देऊन विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पात कामगार वर्गासाठी देखील एक मोठी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कामगाराला किमान पगार आणि सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेण्यात आलेला सगळ्यात क्रांतिकारी निर्णय आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“२८००० प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्यात येणार आहे. ज्यामुळे अत्याधुनिक मात्र परवडणारी अशी हेल्थ सिस्टम ग्रामीण भारताला मिळणार आहे. अर्थसंकल्पाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, : सर्व अर्थतज्ज्ञ सांगत होते, कि कितीही अडचण असली तरी पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी करू नका, सगळ्यांना भिती होती कि लॉचडाउनमुळे पायाभूत सुनिधांवरचा खर्च सरकार कमी करेल. मात्र सरकारने एक बोल्ड निर्णय़ घेतला आणि साडे ५ लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचा धाडसी निर्णय़ सरकारने घेतला आहे. ही एक खूप मोठी बाब आहे.” असे देखील त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.
भारताचा अर्थसंकल्प ९४ हजार कोटींवरुन सरळ २.२३ लाख कोटींवर नेण्यात आलेला आहे, आणि भारतासाठी, भारताच्या विकासासाठी ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. या अर्थसंकल्पातील महत्वाच्या मुद्यांबद्दल माहितीसाठी इथे क्लिक करा.
