५ महिन्याच्या तीरासाठी फडणवीस आणि मोदी तत्पर

गेल्या अनेक दिवसांपासून आपण बातम्यांमध्ये, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर वर बेबी तीरा आणि तिला झालेल्या दुर्धर आजाराबद्दल वाचलेच असेल. मुंबई येथील तीरा कामत या ५ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एक दुर्धर आजार झाला आहे, ज्याच्या उपचारासाठी तब्बल १६ कोटींहून अधिक रुपये खर्च येणार आहे. यासाठी तीराच्या आई वडिलांनी मिळतील ते सर्व उपाय आणि प्रयत्न केले, आणि तीराबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत ही बातमी पोहहोचली, त्यांनी अथक प्रयत्न करत केंद्र सरकार पर्यंत सर्व माहिती पोहोचविली आणि आज बेबी तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवर आकारण्यात येणारा तब्बल साडे ६ कोटी रुपयांचा कर माफ करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आणि वेळीच मदतीसाठी धावून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तीराच्या उपचाराचा मार्ग प्रशस्त झाला आहे, यामुळे तीराच्या आई वडिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व माहिती दिली, आणि मदत करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी ही तत्परतेने सर्व सूत्र आपल्या हातात घेत, साडे ६ कोटी रुपयांचा औषधांवरील कर माफ केला, ज्यामुळे तीराच्या आईवडिलांना खूप मोठी मदत झाली आहे.

तीरावर सध्या मुंबई येथे उपचार सुरु आहेत, आणि संपूर्ण देश तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.