
भारत आणि चीन सीमेवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर आज एक चांगली बातमी आली आहे. चीनच्या सेनेने पँगॉंग सरोवरापासून आपले लष्कर माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी आपले तंबू हटवण्याचे कार्य देखील सुरु केले आहे.
इतकंच नाही तर फिंगर ८ पासून पुढे घुसखोरी करत चीनकडून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेलं बांधकामही पाडण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत, पूर्व लडाख भागात भारत – चीन सेनेदरम्यान सैन्य माघारीबद्दल करार झाल्याचं म्हटलं होतं. चीनबरोबर पॅन्गाँग सरोवर भागात सैन्य माघारीच्या करारानुसार दोन्ही बाजू टप्प्याटप्प्याने, समन्वय आणि सत्यापन पद्धतीनं मागे हटतील. या प्रक्रियेदरम्यान भारतानं ‘काहीही गमावलं नाही’ असा दावाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला होता.
गेल्या वर्षी गलवान घाटी येथे झालेल्या चकमकीत भारताने आपल्या अनेक जवानांचा जीव गमावला आहे, त्यानंतर संपूर्ण जगाला कोरोनाने या चीनने त्रस्त केले. भारताच्या सीमेवर सुरु असलेल्या वादामुळे लद्दाख आणि त्या आसपासचा भाग सतत भितीच्या सावटाखाली होता, त्यामुळे चीनच्या सैनिकांचे या भागातून माघार घेणे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
