नेमकी कोणाची चौकशी ? लता दीदी, आणि मास्टर ब्लास्टर का अजून कोणी ?



गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार वर ‘लता दीदी आणि सचित तेंडुलकर यांच्या ट्वीट्सची चौकशी करा’ असे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. त्यावरुन उठलेले वादाचे वादळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. याविषयी अनिल देशमुख यांनी मात्र ‘आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’ असल्याचे सांगितले आहे. ‘लता दीदी आणि सचिन तेंडुलकर आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी विपक्षाच्या आयटीसेल ची चौकशी करण्यासंबंधी वक्तव्य केले होते, लता दीदी आणि तेंडुलकर यांच्या नाही’ असे म्हणत त्यांनी आपले वक्तव्य फिरवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सामान्य जनते समोर प्रश्न उपस्थित झाला आहे कि नेमकी कोणाची चौकशी होणं अपेक्षित आहे ?

शेतकरी आंदोलन सुरु असताना, या आंदोलनाला ग्रेटा थरबर्ग ने ट्वीट केलेल्या ‘टूलकिट’ मुळे एक वेगळं वळण लागलं. त्यामुळे लक्षात आलं कि आपल्या देशाची प्रतिमा मलीन होण्यासाठी काही लोक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या खांद्यावरुन बंदूक चालवण्याचा प्रयत्न करताएत. याचा विरोध करण्यासाठी काही भारतीय सेलिब्रिटीज ने एकत्र येऊन ‘भारत एकसंध आहे, आणि कुठलाही प्रपोगंडा भरताला तोडू शकत नाही.” अशा आशयाचे एक ट्वीट केले. या सेलिब्रिटीज मध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अजय देवगण, अक्षय कुमार इत्यादि सगळ्यांची नावे सामिल होती. या ट्वीट्सची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव झाला, आणि सामान्य जनतेने त्यांच्या लाडक्या सेलेब्रिटीजना खोटं ठरवत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. असे सगळे असताना आज अनिल देशमुख यांनी “मी विपक्षाच्या आयटी सेल ची चौकशी करा” असे म्हणत पुन्हा एकदा वक्तव्य फिरवण्याचा प्रयत्न केला आहे.


या आधी मुंबई पोलिसांवर पालघर कांड आणि सुशांत सिंह निधन प्रकरणामुळे सामान्य जनतेकडून टीके झोड उठली असताना, अनिल देशमुख सह सर्व सेलेब्रिटीज ने आपली ट्वीटर आणि फेसबुकची डीपी बदलत मुंबई पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवला होता, प्रत्येक सेलिब्रिटीने अगदी सारखे ट्वीट केले होते, त्यावेळेला हा प्रश्न त्यांच्यावर का उपस्थित करण्यात आला नाही ? तेव्हा त्या ट्वीट्सची चौकशी का करण्यात आली नाही ? का ते मुद्दाम मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी होते ? असा प्रश्न आज सामान्य जनता अनिल देशमुख यांना विचारत आहे.

एकूणच शेतकरी आंदोलन हे मूळ मुद्यावर न राहता भरकटत जात आहे, आणि त्यावर येईल तो व्यक्ति आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे शाहण्या माणसाने कुणावर विश्वास ठेवावा ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता नेमकी चौकशी होणार ती कोणाची ? या प्रश्नाचे अद्याप उत्तर समोर आलेले नाही.