आता मुख्यमंत्री गप्प का ? काँग्रेस ने देखील सांगावे महावसूली सरकार मध्ये कितीची भागीदारी ?



महाराष्ट्रात सध्या जे काही चालू आहे, त्याने हे सरकार नीतिमूल्ये विसरलेले सरकार आहे, असेच स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत? हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार दोन दिवसांपासून आपल्या सरकारचा बचाव केला आणि कांग्रेसतर अस्तित्वातच दिसत नाहीये. काँग्रेसने देखील सांगावे कि या महावसूली आघाडी सरकारमध्ये त्यांची कितीची भागीदीरी आहे ? असा प्रश्न आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आज फडणवीस यांनी विविध भाजप नेत्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी साधण्यात आलेल्या संवादात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

भगतसिंह कोशियारी यांना मेमोरेंडम देत या प्रकरणाची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय गदारोळाला दर दिवशी एक वेगळं वळण लागतंय. माजी कमिश्नर परमबीर सिंह यांनी फोडलेल्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्र सरकार पुरतेच हादरले आहे. त्यांच्या या पत्रानुसार खूप मोठा भ्रष्टाचाराचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या बचावासाठी शरद पवार पुढे येऊन दर दिवशी प्रेस कॉन्फरेंस घेत आहेत. मात्र दर वेळेला त्यांचे पितळे उघडे पडतेय. या संपूर्ण प्रकारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कोरोना झाल्याचे कारण देत मुख्यमंत्री वर्षा वर क्वारंटाइन झाले आहेत, आणि ते समाज माध्यमांपासून देखील दूर दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. चहु बाजूंनी महाराष्ट्र सरकार आता घेरले गेले आहे.



देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले कि, “सत्ताधारी पक्षाला माध्याविरोधात केस करायची असेल तर ती त्यांनी अवश्य करावी. मी त्यांना घाबरत नाही. त्यांनी माझ्यावर ४ केसेस कराव्या मी कोर्टात जाऊन माझा मुद्दा सिद्ध करेन.

याशिवाय आज परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटले आहे कि हे प्रकरण गंभीर आहे, आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले पाहिजे असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परमबीर सिंह यांची पोलिस कमिश्नर या पदावरून बदली करून त्यांना होम गार्ड्सची जबाबदारी सांभाळण्यास सांगण्यात आले होते. याशिवाय ८० पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारवर आता मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

हे सर्व प्रकरण काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या एंटालिया या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडल्याने गदारोळ उडाला होता. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचे प्रेत सापडल्याने या थरार नाट्याला वेगळेच वळण लागले. या संदर्भात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली, आणि त्यासंदर्भातच परमबीर सिंह यांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून संपूर्ण सरकार हालले.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करते का ? आरोपींवर कारवाई करण्यात येईल का ? हे सर्व बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.