आघाडी सरकारला फडणवीसांचा दणका…!

महाराष्ट्रात सुरु असलेल्या थरार नाट्याला रोज एक नवीन वेगळे वळण लागत आहे. काल एनसीपी चीफ शरद पवार यांनी प्रेसवार्ता घेऊन सांगितले कि गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारी रोजी होम क्वारंटाइन मध्ये असल्यामुळे पत्रात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वाद विवाद सुरु झाले, आज पवार यांच्या वक्तव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. संपूर्ण डेटा आणि माहितीसह त्यांनी पवार यांची माहिती खोटी पाडली आहे, आणि आज फडणवीस यांनी प्रेसवार्ता घेत अनेक महत्वपूर्ण खुलासे केले आहेत.

फडणवीस यांनी खुलासा केला कि त्यांच्याकडे कॉल्स ट्रांस्क्रिप्टचा एक महत्वपूर्ण ६.३ जीबी चा डेटा आहे. ज्याच्या माध्यमातून खूप महत्वाची माहिती मिळू शकते. सोबतच त्यांनी मेनीफेस्टची माहिती देत सांगितले कि अनिल देशमुख १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री गेस्टहाउस येथे उपस्थित होते. तसेच २४ फेब्रुवारी रोजी देखील पोलिस मेनिफेस्टच्या डेटानुसार ते सह्याद्री गेस्टहाउस येथे गेल्याची माहिती दिली होती. याचा अर्थ असा कि काल शरद पवार यांना चुकीचे ब्रीफिंग देण्यात आले, आणि त्यांच्या तोंडातून खोटे वदवून घेतले. पवार हे अनिल देशमुख यांना प्रोटेक्ट करत असताना दिसून आले. शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख होम क्वारंटाइन मध्ये असल्याचे म्हटले जात आहे, मात्र हे साफ असत्य आहे, हे दिसून येते.

ही अतिशय महत्वपूर्ण आणि धक्कादायक माहिती होती. या सर्व प्रकारात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका अतिशय संशयास्पद दिसते. शरद पवार यांच्या सारख्या एका राष्ट्रीय नेत्याला अतिशय केविलवाण्या पद्धतीने माध्यमांसमोर खोटे बोलण्यास भाग पाडले जात आहे, तसेच या सर्व प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांनी कमालीचे मौन बाळगले आहे.



फडणवीस यांनी ते गृहमंत्री असतानाचे देखील काही अनुभव सांगितले. तसेच त्यानी सांगितले की,” सीओआय रश्मी शुक्ला यांना तीनही सरकारचे अनुभव असल्यामुळे त्यांना देखील हे लक्षात आले कि २०२० मध्ये पोलिस आणि नेते यांच्याच काहीतरी गौड बंगाल सुरु आहे. आणि म्हणूनच त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगून कॉल इंटरसेप्शनला लावले. आणि त्यानंतर याचे रिपोर्ट तयार झाले, त्यानुसार २५ ऑगस्ट २०२० रोजी एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि तो रिपोर्ट २६ ऑगस्ट रोजी रिपोर्ट गृहमंत्रालायत गेला. मात्र यावर कारवाई उल्टीच झाली. सीओआय यांचे प्रमोशन थांबविण्यात आले, आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना अधिक बढती देण्यात आली, त्यांचे रिकॉर्ड्स अतिशय उत्तम असल्यामुळे सरकारला त्यांना बढती देणे भाग पडले मात्र त्यांना अशा ठिकाणी बढती देण्यात आली, जी पोस्ट अस्तित्वातच नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या अतिशय सेंसेटिव्ह रिपोर्ट वर काहीच कारवाई करण्यात आली नाही. या रिपोर्ट मध्ये सीरिअर ऑफिसर्सची नावे आहेत. आज मी दिल्ली येथे होम सेक्रेटरी ऑफिस मध्ये जावून हा रिपोर्ट त्यांच्याकडे देणार आहे.” तसेच या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सीबीआय ने करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

हे सर्व खुलासे धक्कादायक आहेत. हे सरकार म्हणजे केवळ भ्रष्टाचारासाठी सत्तेवर आलेले सरकार आहे का ? या सरकारच्या कार्यकाळात साधु संत, तरुण मंडळी, विद्यार्थी, पत्रकार, शेतकरी कुणीच सुखी नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांवर इतके गमभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांना वाचवणाऱ्या मंडळीचं पितळं सतत उघडं पडंतय, आणि तरीही स्वत:ला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्याचे त्यांचे प्रयत्न थांबत नाहीयेत. एकूणच काय तर महाराष्ट्राची “अंधेर नगरी चौपट राजा” असे झाले आहे. मात्र सामान्य जनता ही आंधळी नाही, उघड्या डोळ्यांनी सरकारचा हा भ्रष्टाचाराचा खेळ बघतेय. या संपूर्ण प्रकाराचा अतिशय विपरीत असा असर महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार यात काहीच वाद नाही. या प्रकरणात आता पुढे काय होतं, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.