
महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय वादळ उठले आहे. या वादळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख तर अडकलेले आहेतच, मात्र आता मंत्री अनिल परब हे देखील संकटात आले आहेत. आज या प्रकरणात अटक झालेले, पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांच्या वकीलांनी सचिन वाझे यांचे एक पत्र कोर्टात देणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर देखील निशाणा साधत कबुल केले आहे कि अनिल देशमुख यांनी त्यांच्याकडून वसूली करण्याचे निर्देश दिले होते. सचिन वाझे यांच्या पत्रामुळे महाराष्ट्र सरकारची मुळे हालली आहेत.
या पत्रात त्यांनी सांगितले आहे कि, सचिन वाझे यांची नियुक्ति होत असताना शरद पवारांना हे पटत नव्हते, मात्र अनिल देशमुख यांनी वाझे यांना “२ कोटी रुपये मला दिल्यास मी शरद पवार यांनी मनधरणी करतो.” असे वचन दिले. या शिवाय त्यांनी राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील आरोप लावत म्हटले आहे कि, परब यांनी देखील सचिन वाझे यांना ५० ठेकेदारांकडून २-२ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. एकूणच हे सरकार किती भ्रष्टाचार करणारे सरकार आहे, हे आधी परमबीर सिंह आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रांमधून स्पष्ट झाले आहे.
एनआयए ने सचिन वाझे यांच्या पोलिस कोठडीत ९ एप्रिल पर्यंतची वाढ केली आहे. तसेच सचिन वाझे यांचे वकील हे पत्र कोर्टाकडे सुपूर्द करणार आहे. या पत्रात सर्व माहिती लिखित स्वरूपात असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात हा एक मोठा पुरावा असू शकतो.
महाराष्ट्र सध्या अनेक समस्यांचा सामना करतोय. यामध्ये वाढते कोरोना रुग्ण, वाढते मृत्यु आणि एक भयंकर आणि खालच्या थराची राजकीय खेळी आहे. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासूनच महाराष्ट्रात त्यांच्या भोंगळ कारभारामुळे ते चर्चेत आहेत. पालघर येथील साधुंचे मॉब लिंचींग असू देत नाही तर कंगना रणौतचे मुद्दाम पाडलेले घर, अर्णब गोस्वामीची अटक आणि छळ असू देत किंवा मनसुख हिरेन हत्या प्रकरण, महाराष्ट्र सरकार चहु बाजूंनी घेरलं गेलंय. या सर्व परिस्थिती आता पुढे काय होतं ? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
