मुंबईत वाढणारा मृत्युदर, एक चिंतेची बाब…!

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे. मुंबईत देखील ही संख्या खालावली आहे, मात्र मुंबईत वाढणारा मृत्युदर हा मात्र एक चिंतेची बाब आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आकड्यांनुसार मृत्युदर जास्त आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण स्थिरावले जरी असले, किंवा कमी जरी झाले असले, तरी हा मृत्युदर म्हणजे एक चिंतेची बाब आहे.


कोरोनाच्या संकटात मुंबई मुंबई महापालिकेचे कौतुक होत असल्यास हा मृत्युदर अधिक का ? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. गेल्या काही दिवसात मुंबईतला मृत्यूदर वाढतोय. पाहूयात आकडेवारी :

  • 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हा मृत्युदर 0.6 टक्के होता.
  • 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान मृत्युदर 1.14 टक्क्यांवर पोहोचला. 
  • 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान मृत्युदर 2.17 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
  • 5 मे ते 11 मे दरम्यान मृत्यूदर 2.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

म्हणजेच मुंबईत सरासरी 2.03 टक्के मृत्युदर आहे. तर महाराष्ट्रात तो 1.48 इतका आहे. 15 एप्रिल दरम्यान महाराष्ट्राचा पॉसिटिव्हिटी रेट 15.8 टक्के होता. तर मुंबईचा पॉसिटिव्हिटी रेट 5.53 टक्के होता. सध्या महाराष्ट्राचा पॉसिटिव्हिटी रेट 17.36 टक्के आहे. तर मुंबईचा पॉसिटिव्हिटी रेट 1.58 टक्के आहे.  विशेष म्हणजे मुंबईत कोरोनाचे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे मुंबईची जनता आता भयभीत आहे. पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.