
कोरोनाच्या वाढत्या केसेस, लॉकडाउन, त्यात चक्री वादळ अगदी २०२० असल्यासारखे वाटतेय ना ? मात्र ते नाहीये कारण भारतात पुन्हा एकदा एका चक्रीवादळाने धुडगूस घातला आहे, आणि त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. शिवाय किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
https://twitter.com/ShivAroor/status/1394183983911510019/photo/2
मंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागांवर या चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. आज दिवसभर महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. यामुळे झाडांचे आणि रस्त्याचे अनेक ठीकाणी नुकसान झाले. या चक्रीवादळात मच्छीमारांची बोट देखील अडकली आणि त्यात १५ मच्छीमार देखील अडकले होते, मात्र त्यांना सुखरूप सोडविण्यात आले आहे.
चक्रीवादळासंदर्भात आधीच सूचना देण्यात आली होती, तसेच सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी काळजी देखील घेण्यात आली होती. आता हे चक्रीवादळ हळू हळू गुजरातच्या दिशेने सरकते आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांना सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सामोरं जावं लागलं. हळू हळू या चक्रीवादळाचा असर कमी होईल असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
