विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रामक, सरकारची पळता भुई थोडी…!



आज महाराष्ट्रात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता, आणि आजच्या दिवशी विरोधीपक्षाने आक्रामक पवित्रा घेतला होता. विरोधी पक्षाद्वारे आज महाराष्ट्रात झाेलल्या बालमृत्युंविषयी वाचा फोडण्यात आली. यावेळी आक्रामक पवित्रा घेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कान उघडणी केली. “आणखी किती बालकांचा मृत्यु झाल्यानंतर सरकार जागे होणार आहे?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भांडुप येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार बालकांचा फंगी आणि व्हायरस यामुळे मृत्यु झाला, त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. 


ते म्हणाले, “देशातील सगळ्यात श्रीमंतर महानगर पालिका आपली आहे. आपल्या कडे ५० – ५० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. असे सगळे असताना इतके निष्काळजी सरकार कसे काय? ही कशी व्यवस्था आहे? आज एनआयसीयू मध्ये अशी घटना घडते आहे. इतर काहीही असतं तर एकवेळ सहन केलं असतं, मात्र बालकांचा अशा पद्धतीने मृत्यु होणं सहन केलं जाणार नाही. या ठीकाणी तातडीने वरीष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे.” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.



यावेळी राज्य सरकारवर टीका करत फडणवीस म्हणाले कि, “ राज्याची परिस्थिती भयावह आहे, आणि यावर राज्य सरकारची कुठलीही प्रतिक्रिया नाही.”. आज एकूणच विधानसभेत गदारोळ झाला.



यावेळी विरोधीपक्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले. विरोधीपक्ष नेते म्हणाले कि, “कुठे गेली तुमची कर्जमुक्ती ? 

कुठे गेली शेतकऱ्यांची चिंतामुक्ती? वन टाईम सेटलमेंट योजना, 50 हजार रुपये प्रोत्साहनपर घोषणा होऊन 2 वर्ष झाले, ना शासन आदेश, ना अंमलबजावणी शेतकर्‍यांची फसवणूक तर केलीच. पण, महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव देताना किमान ती योजना फसवी नसावी.

याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप, कोकणात आलेले संकट, ओबीसी आरक्षण या सर्व विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.