
“महाराष्ट्र विधानसभेत नुकत्यास पास करण्यात आलेल्या विद्यापीठ सुधारणाविधेयकाला आमचा तीव्र निषेध आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विधासभेसाठी काळादिवस आहे, ही एक प्रकारची लोकशाहीची हत्या आहे.” अशा भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यापीठांना आणि विद्यार्थ्यांना राजकारणापासून लांब ठेवण्यात यावं अशी मागणी आम्ही करत आहोत. असे अताना विधानसभेत चर्चा सुरु असाताना, चर्चेच्या मध्येच हे विधेयक पास करण्यात आलं. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच महाविकास आघाडीच्या या अरेरावी विरोधात भारतीय जनता पक्ष जानेवारीत उग्र आंदोलन करेल असा इशारा ही यावेळेला विरोधीपक्षाने दिला.
स्वायत्ततेवर घाला घालण्याचा हा सरकारचा डाव आहे. विद्यापीठ शिक्षण, प्रशासनात रोज हस्तक्षेप सुरू झाला,तर विद्यापीठांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले, तसेच “या विधेयकामुळे शिक्षणाचा सत्यानाश होईल. काळ माफ करणार नाही!” अशा भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या वेळचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन गाजलं. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मुंबई येथे बालकांचा झालेला मृत्यु, कोरोना, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, शिक्षण व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण अशा अनेक विषयांवर या अधिवेशनात चर्चा झाली. मात्र या चर्चेचा उपयोग महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला कसा होईल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
