मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली : फडणवीस


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. या निमित्ताने सत्तापक्षावर निशाणा साधत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले कि, “सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



ल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला आठ जागांवर विजय मिळवता आला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल सतीश सावंत यांच्या, तर भाजपचे सिद्धिविनायक पॅनेल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढले होते.

या निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आणि या निवडणूकीत भाजपने दणदणीत विजय मिळवून आपली छाप सोडली आहे. आणि यामुळे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. असे असताना यावर महाविकास आघाडीचे काय म्हणणे असेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.