रात्री कर्फ्यू केवळ सामान्य माणसांसाठी ‘डांस बार’साठी नाही : देवेंद्र फडणवीस



महाराष्ट्र राज्य सरकारने रात्री कर्फ्यू, संचारबंदी, जमावबंदी हे सर्व नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी लावले आहेत. मात्र हेच नियम डांसबार वर लागू होत नाहीत. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षावर लावला आहे. आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ते सभागृहात बोलत होते.



ते म्हणाले कि, “नवी मुंबई येथे 6 डांस बार आहेत, जिथे रात्री कर्फ्यूचे कुठलेही पालन केले जात नाही. हे सर्व नियम, ही संचारबंदी केवळ सामान्य माणसांसाठी आहे. या पैकी एका डांसबारमध्ये तर वेश्या व्यवसाय केला जातो. कॅमेऱ्याच्या समोर आलेल्या फुटेज मध्ये मुलींचे दर ठरवलेले समोर आले आहेत. एका मुलीचा तीन हजार रुपये दर ठरवतानाचे व्हिडियो फुटेज आहे. ही अतिशय निंदनीय आणि घाणेरडी परिस्थिती आहे. मंत्री महोदयांनी यावर कडक कारवाई करावी. आणि या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारण्यात यावा” अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.

राज्यात एकूणच महिलांच्या सुरक्षेविषयी काल सभागृहात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. संपूर्ण राज्यात महिला सुरक्षित नाही, आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गृहखातं काय करतंय? असा प्रश्न यावेळी विरोधीपक्षाने उपस्थित केला आहे.

या हिवाळी अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाल्या मात्र त्यामध्ये बालकांच्या मृत्यु प्रकरणी आणि महिला सुरक्षेप्रकरणी मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. या चर्चेचा फायदा सामान्य जनतेला कसा होतो, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.