कथक नृत्य परंपरेतील एक युगाचा अंत, पंडित बिरजू महाराज यांचे निधन



तखत नृत्य परंपरेतील एक नावाजलेले नाव ज्यांनी संपूर्ण जगात भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रचार प्रसार केला, असे पंडित बिरजू महाराज यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता एकताच संपूर्ण कला क्षेत्रात शोकलहर निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने भारीतय कलाक्षेत्र पोरके झाले, ही पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, अशा भावना पंडित बिरजू महाराज यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केल्या आहेत.



महाराज जींचे जाणे संपूर्ण कला जगतासाठी एक अपूरणीय क्षति” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

“पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची वार्ता समजल्यास अतीव दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कला जगतात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे जाणे कला जगतासाठी एक अपूरणीय क्षति आहे. दु:खाच्या या समयी माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली दिली आहे.



भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रसारात त्यांचे योगदान भारत कधीच विसरणार नाही” : फडणवीस

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करत ट्वीट केले आहे कि, “पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची वार्ता एकताच अतिशय वाईट वाटले. भारतीय शास्त्रीय नृत्याचा संपूर्ण जगात त्यांची प्रचार प्रसार केला. कला क्षेत्रातील त्यांचे योगदान भारत कधीच विसरणार नाही. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली”

महाराज जींचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 साली कथकच्या प्रसिद्ध ‘लखनऊ घराण्यात’ झाला. त्यांचे पिता प्रसिद्ध कथक गुरु अच्छन महाराज होते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले आणि पंडित जींनी कथकच्या दुनियेत आपले पहिले पऊल ठेवले. त्यांचे संपूर्ण नाव ‘बृजमोहन मिश्रा’ असे आहे, मात्र संपूर्ण जग त्यांना ‘बिरजू महाराज’ नावाने ओळखतं. त्यांना 1986 साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मागे त्यांचा भरापूरा परिवार आहे. त्यांचा 5 अपत्ये आहेत. ज्यापैकी 2 मुली आणि 3 मुले आहेत. त्यांची तीन्ही मुले ममता महाराज, दीपक महाराज आणि जयकिशन महाराज कथक क्षेत्रात पंडिंत जींचे नाव मोठे करत आहेत.

पंडित बिरजू महाराज गेले आणि कथकच्या एका युगाचा अंत झाला. असा कलाकार पुन्हा होणे नाही. ते तर गेले मात्र मागे कथ नृत्याचा एक मोठा वारसा सोडून गेले आहेत. त्यांच्या प्रत्येक रचनेत ते आपल्याला भेटत राहतील.