भविष्यातील वेध घेणारा, राष्ट्राला बलशाली करणारा अर्थसंकल्प…!



“भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रस्तुत केला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडावर अधिक संतुलित आणि समावेशी तसेच विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आज भारताचा 2022-23चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. याविषयी आपली प्रतिक्रिया देताना फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

“शेतकरी आणि कष्टकारी वर्गाच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. एक लाख मेट्रिक टन भात खरेदीसह 2.37 लाख कोटी रुपये हे एमएसपीवर खर्च होणार आहेत. शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येणार आहे. शेती क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्ससाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येणार आहेत. “हर घर नल से जल” या योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.” असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आणि सगळ्यांसाठी असलेला अर्थसंकल्प आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात स्टार्टअप्स आणि इन्होवेशन क्षेत्रासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात एक सशक्त आणि सबल भारत तैयार होईल. अशा भावना देखील राज्यातील विरोधीपक्षाने व्यक्त केल्या आहेत.

आजच्या अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात सामान्य माणासाला दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला आहे. आता देशभरातून याविषयी काय प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.